रायगड: आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण होणार? अशी देखील चर्चा सुरु आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते प्रविण दरकेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी टीका करण्यापेक्षा नवनिर्माणाचे स्वप्न बघावं. आमच्याकडे मनसेचे अनेक तालुकाध्यक्ष आलेलं आहेत असा टोला दरेकरांनी लगावला.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. यानंतर काही विरोधकांनी टीका केली. यावर बोलताना दरेकर म्हणाले. विरोधकांनी टीका करताना कुठे राजकारण करावे याचे तारतम्य बघावं असी टीका प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर केली. दादांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ताईंचा आज स्वागत केले पाहिजे. परंतु खोट्या मनोवृत्तीचा विरोधी पक्ष असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर बोलतना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी टीका करण्यापेक्षा नवनिर्माणाचे स्वप्न बघावं. आमच्याकडे मनसेचे अनेक तालुकाध्यक्ष आलेलं आहेत. मात्र, मला घडविण्यात राज ठाकरे यांचा हात आहे, त्यामुळं मी अधिक काही बोलणार नाही असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरु आहे. मात्र, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. अजित दादांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक सभा रद्द झाल्या आहेत. हा महाराष्ट्रावर वाईट प्रसंग असल्याचे दरेकर म्हणाले.
रायगड जिल्हा परिषदेत यंदा जास्त राजकीय घराणेशाहीला उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे, यावर विचारले असता दरेकर म्हणाले की, घराणेशाहीतील कर्तृत्ववान उमेदवार असेल तर हरकत नाही. परंतू, केवळ घराण्याचा आहे म्हणून उभे राहणे हे इतर कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचे दरेकर म्हणाले.