IND vs NZ : संजूला झटका, सामन्यादरम्यान हिसकावली मोठी जबाबदारी, वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळण्याचे संकेत!
admin February 01, 2026 03:24 AM
[ad_1]

भारताने न्यूझीलंडवर पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात मात करत मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सातत्याने टी 20i मालिका जिंकण्याची परंपरा कायम राखली. आता टीम इंडिया थेट टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. भारतात 7 फेब्रुवारीपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला मोठा झटका लागला आहे. संजूकडून पाचव्या सामन्यादरम्यान मोठी जबाबदारी काढून घेण्यात आली.

संजूऐवजी सामन्या दरम्यान इशान किशन विकेटकीपरच्या भूमिकेत दिसला. हा असा प्रकार संजूला वर्ल्ड कप स्पर्धेतील प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू मिळण्याचे संकेत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे. नक्की या सामन्यात काय झालं? हे जाणून घेऊयात.

संजू सॅमसन या मालिकेतील पहिल्या 4 टी 20i सामन्यात अपयशी ठरला. संजूला फक्त 40 धावाच करता आल्या. मात्र त्यानंतरही संजूला त्याच्या घरच्या मैदानात अर्थात तिरुवनंतरपुरममधील ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये संधी देण्यात आली. संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात आलं. मात्र संजूने इथेही निराशा केली. तर दुसऱ्या बाजूला इशान किशन याने कमाल केली. इशानने शतक झळकावलं. इशानने 103 धावांची विस्फोटक खेळी केली. इशानने केलेल्या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं.

न्यूझीलंडची सलामी जोडी विजयी धावंचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. तर संजूऐवजी इशान किशन याच्या हातात ग्लोव्हज दिसले. यातून संजूऐवजी इशान विकेटकीपिंग करणार असल्याचं स्पष्ट झालं. वर्ल्ड कप स्पर्धेआधीच्या शेवटच्या सामन्यात टीम मॅनेजमेंटच्या अशा निर्णयामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. इशानला वर्ल्ड कप स्पर्धेत विकेटकीपिंगची जबाबदारी देऊन संजूला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर ठेवण्याची रणनिती आखली जात नाही ना? असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.