सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर छगन भुजबळांचे मोठे विधान, म्हणाले, राज्यपालांना सांगून…
Tv9 Marathi January 31, 2026 10:46 PM

अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनाबद्दल सर्वांनाच मोठा धक्का बसला. काल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यादरम्यान उपमुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा झाली. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. सुनेत्रा पवार यांनी कोणतीही चर्चा पवार कुटुंबियांसोबत न करता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असताना लगेचच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. शरद पवार यांनी म्हटले की, दोन्ही पक्षाचे विलिगीकरण होणार होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी होती. यादरम्यान छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले. छनग भुजबळ यांनी म्हटले की, सर्वसामान्य आणि आमदारांचे मत विचारत घेतले. सुनेत्रा ताई यांना उपमुख्यमंत्री करणे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू.. आता त्याची जी प्रक्रिया आहे, जे कोणी आमदार लोक आहेत, त्याप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ते आज दुपारी करू.

मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत. कदाचित आजच राज्यपालांना सांगून तो शपथविधी होईल, उपमुख्यमंत्री म्हणून. दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या विषयावर आणि शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी आपल्याला कोणतीही कल्पना दिली नसल्याचे मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, मला यावर काहीच बोलायचे नाहीये.

पत्र लवकरच निघावे, याकरिता कालपासून माझा प्रयत्न होता. सर्वात महत्वाची गोष्टी म्हणून आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वात मोठे पद कोणते असेल तर ते उपमुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे तिथे योग्यपद्धतीने ती सूत्रे जी आहेत ती सुनेत्रा ताईंच्या हातात देणे हे महत्वाचे आहे.. त्यानंतर ते ठरवतील पुढे काय काय करायचे.. शरद पवारांच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी बोलणे टाळले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.