अजितदादांसोबत मृत्यू पावलेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी रोहित पवार सरसावले; भावाच्या भविष्यासाठी दिलं मोठं आश्वासन
सुरज सावंत February 01, 2026 12:43 PM

मुंबई: 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघात झाला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. अजित पवारांसह पिंकी माळी, विदीप जाधव,  कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील मृत्यू झाला. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार हे वरळी मधील पिंकी माळी (pinky mali) हिच्या घरी तिच्या परिवाराचे सांत्वन केले आणि पिंकी हिच्या भावाला देखील चांगलं कामाला लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मुंबईहून बारामतीच्या दिशेनं रवाना होण्यासाठी अजित पवारांसह 5 जण विमानातून प्रवास करीत होते.  यावेळी विमानातील पाचही जणांचे दुर्देवी निधन झाले. फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे (pinky mali)  देखील या विमान अपघातात निधन झाले. निधनाची बातमी समजताच माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पिंकी माळीचं पार्थिव हे अंतिम दर्शनाकरिता तिच्या सासरी कळवा येथे काही वेळ आणण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले. पिंकी माळीच्या वडिलांना अश्रु अनावर झाले. तर, पिंकीच्या पतीला हे दु:ख पचवणे कठीण जात आहे. (pinky mali)   

मुंबईत माळी परिवार यांना भेट दिली. त्या अजित दादांसोबत विमानात होत्या. पवार परिवार आणि राष्ट्रवादी परिवार आणि महाराष्ट्र दुःखात आहे. यातून आम्ही जसे सावरण्याचा प्रयत्न करतो, तसे आमचीही जबाबदारी आहे त्यांच्यासोबत राहणं. पिंकीताईंचे वडिल टॅक्सी चालवतात, मुलीच्या शिक्षणासाठी खोली विकली. पिंकीताईंनी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं. कुठेतरी घर सावरायला लागलं असताना ही घटना घडली. त्यांची इच्छा होती भाऊ कॅप्टन व्हावं. मात्र त्यांचं अद्याप शिक्षण पूर्ण झालेला नाही. त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केलेत. दुखवट्यात राजकिय प्रतिक्रिया देणार नाही. ⁠सुनेत्रा काकीने शपथ केली आनंद आहे मात्र शुभेच्छा देऊ शकत नाही. आज अत्यंत दुखत घटनेनंतर त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ⁠तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र आम्ही आजही दादांच्या स्थानी सुनेत्रा काकीने पाहतो. राजकारण काय झालं कसं झालं यावर आम्ही १३ दिवसांनंतर बोलू. ⁠विलनीकरणाच्या पहिल्या दिवसापासून मी होतो यावर १३ दिवसांनंतर बोलेन. कालही पार्थ पवार आणि आमची भेट झाली नाही आमचे कुटुंब दुःखात आहे त्यावेळी कुठेही राजकीय चर्चा नाही असं रोहित पवारांनी सांगितलं.

कोण आहे पिंकी माळी?

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील पिंकी माळी हिचाही समावेश आहे. पिंकी माळी ही विमानातील फ्लाइट अटेंडंट होती. ती केराकत तहसीलमधील भैंसा गावाची रहिवासी होती. शीतला प्रसाद माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकीचा विवाह झाला असून तिचे कुटुंबीय सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. आपना दल (एस) पक्षाचे राष्ट्रीय सचिव पप्पू माळी यांनी सांगितले की, पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. जुलै महिन्यात मुंबईत त्यांची भेट झाली होती. या भीषण घटनेने आपण पूर्णपणे हादरून गेलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणासह अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली असून, घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे. पिंकी माळी कोण आहेत? माहितीनुसार पिंकी माळी ही शिवकुमार माळी यांची मुलगी होती. ती अपघातावेळी अजितदादांसोबत विमानात उपस्थित होती. क्रु मेंमर म्हणून ती कार्यरत होती.

गेल्या ५ वर्षापासून पिंकी माळी क्रु मेंमर म्हणून काम करत होती. याआधी अजित पवारांसोब ३ वेळा प्रवास केला होता. पिंकी माळी ही प्रायव्हेट विमानामध्ये नेहमी राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यासोबत क्रु मेंमर म्हणून प्रवास करायची. पिंकीचे वडील स्वतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते काही दिवसांपूर्वीच पिंकी आपल्या वडिलांच अजित पवारांशी बोलणं करून देणार होती पण त्यावेळी वडिलांनी फोन न उचलल्याने बोलणं होऊ शकलं नव्हतं आज पुन्हा प्रवासात पिंकी अजित पवारांशी वडिलांचं बोलणं करून देणार होती, पण त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.