उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शोकसभांचे आयोजन केले जात आहे. बहुतांश ठिकाणी सर्वपक्षीयांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. शोकसभांमध्ये पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेचा आधारवड हरपल्याने सर्वांचाच कंठ दाटून येत होता.’’
इंदापूर : ‘‘महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन असलेले नेते म्हणजे अजितदादा. त्यांनी विकासाचा महाराष्ट्र घडवला. सोनाई गूळ प्रकल्पासाठी पवारसाहेबांपुढे बालहट्ट धरणारे दादा मी अनुभवले. आयुष्भर लक्षात राहतील, असे अनेक अनुभव आहेत. अशा नेत्याचे अकाली जाणे धक्कादायक आणि मनाला वेदनादायक आहे,’’ असे भावपूर्ण उद््गार सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी काढले.
Rohit Pawar: रोहित पवार उचलणार शैक्षणिक जबाबदारी! सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या घरी मुलांशी साधला संवाद; पवार कुटुंबीय पाठीशीइंदापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित शोकसभेप्रसंगी दशरथ माने बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रदीप गारटकर, माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने, आकाश कांबळे, बाबासाहेब चवरे, मारुती वणवे, गजानन वाकसे आदी उपस्थित होते.
या वेळी गारटकर म्हणाले, ‘‘वेळेबाबत पक्का असलेला नेता वेळेआधीच गेला, याचे मोठे दुःख वाटते. सर्वसामान्य जनतेच्या निवेदनावर ते सभेतच तत्काळ मार्ग काढायचे. महाराष्ट्रात असे एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये दादांचे योगदान नाही. त्यांच्या कार्याने ते दादा झाले. मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे, हे बारामतीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात दादांनी केलेल्या कामावरून लक्षात येते. त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड होता.
कोणत्याही नेत्याचा एवढा आवाका असू शकत नाही. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेतृत्व होते. अत्यंत कठोर बोलणे, पण मनाने अत्यंत हळवे असलेले दादा कधी कोणाला रागवले तर त्याला मायेने जवळ घ्यायचे. महाराष्ट्राला हवेहवेसे असं वाटणार नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना कधीही विसरू शकणार नाही.’
Satara News: दोन्ही राष्ट्रवादी प्रचारात सक्रिय; विलीनीकरणाचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घ्यावा, सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या भावना!’यावेळी यशवंत माने म्हणाले, ‘‘कोणत्याही अडीअडचणी असल्यास दादांजवळ मांडल्या की मार्ग नक्की निघायचा. दादांनी कधीही आपला- परका, या पक्षाचा- त्या पक्षाचा न करता सर्वांना समान न्याय दिला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे.’’ भाजपचे युवा नेते प्रविण माने यांना यावेळी अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील जनतेसाठी काळा दिवस असून विकासाचे व्हिजन असलेला नेता हरपला.