Budget 2026 Tax Reform : या तारखेपासून नवा आयकर कायदा लागू! आयकर रिटर्न ची तारीख वाढविली, जाणून घ्या काय बदललं
esakal February 01, 2026 08:45 PM

Tax Reform : आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यात सर्वसामान्यांपासून ते मोठ्या व्यावसायिक लोकांचे लक्ष्य होते ते कर प्रणालीमध्ये काय बदल होतो, आणि आयकर रिटर्न साठी किती वेळ वाढून भेटतो.

नवीन आयकर कायदा

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की 1 एप्रिलपासून नाव आयकर कायदा लागू होईल. त्यासोबतच आता खाते ऑडिट वेळेत न केल्यास किंवा आर्थिक व्यवहारांचा अहवाल सादर न केल्यास आकारण्यात येणारा दंड आता फीमध्ये रूपांतरित केला जाणार असून अपघात विम्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही.

ITR तारीख वाढली

ITR सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली जाणार आहे म्हणजे आता आयकर रिटर्न ची तारीख सरकारने वाढविली आहे. त्यामुळे करदात्याना आता दिलासा मिळणार आहे.

2047 पर्यंत टॅक्स हॉलिडे

क्लाउड सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना 2047 पर्यंत करसवलत (टॅक्स हॉलिडे) देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Tourisms Budget 2026: पर्यटन क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन यांची खास घोषणा! भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार परदेशी शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी TCS दरात कपात

परदेशात शिक्षण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी होणाऱ्या खर्चावर आकारला जाणारा TCS (Tax Collected at Source) दर 5 टक्क्यांवरून कमी करून 2 टक्के करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.