लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच २१०० रुपये मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
कोल्हापूरच्या कागल येथील सभेत शिंदेंनी महिलांना आश्वासन दिलं.
एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार,असे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केलं. शिंदे हे कोल्हापुरातील कागलमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आलाय, असं सांगत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्याउमेदवारांना मतं देण्याचं आवाहनही शिंदेंनी यावेळी केलं.
Cancer Medicines: कॅन्सर पेशंटना नवसंजीवनी; जीव वाचवणारी १७ औषधं स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणामहायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रुपये देऊ, अशी घोषणा सरकारमधील नेत्यांनी केली होती. मात्र अद्याप त्याची पूर्तता करण्यात आलेली नाहीये. मात्र आता लवकरच १५०० रुपयांऐवजी २१००चा हप्ता दिला जाईल, अशी शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत पुन्हा एकदा २१०० रुपये देण्याचं आश्वासन महिलांना दिलंय.
Union Budget TV Mobile Price: मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि एसी किती हजारांनी स्वस्त होणार? जाणून घ्याजिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या असताना शिंदेंनी लाडक्या बहिणींना शब्द दिलाय. यावेळी बोलताना एकनाथ शिंदें म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावं लागतंय. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणानं करतोय. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.
याचवेळी त्यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असल्याचे सुतोवाच केले. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आलाय. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच २१०० रुपये देणार आहोत असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.