वाई:-किसन वीर महाविद्यालयात रंगला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम.
esakal February 02, 2026 09:45 AM

देशभक्तिपर गीतांना
‘किसन वीर’मध्ये दाद

वाई, ता. १ : येथील किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, कला व सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांत राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, संविधानातील लोकशाहीची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी उपप्राचार्य डॉ. विनोद वीर, उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव, छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ. समीर पवार उपस्थित होते. डॉ. मंजूषा इंगवले, डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमातून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाचे बलिदान देणाऱ्या थोर महात्म्यांना शब्दरूपी आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले. महापुरुषांच्या व कर्तबगार महिलांच्या कार्याचा उद्घोष करण्यात आला. प्राचार्य डॉ. फगरे यांच्या ‘जहा डाल डाल पर सोने की..’, डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या ‘करितो वंदन भारत मातेला’ या गीताने उपस्थितांची मने जिंकली.

प्रा. सुमती कांबळे यांनी ‘शतकांच्या यज्ञातून...’ हे गीत सादर केले. उदयोन्मुख शाहीर राकेश लगस याच्या ‘अखंड हिंदुस्तान आमुचा...’ या गीतास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
जितेंद्र चौगुले, अनिल लाखे, भक्ती वायदंडे यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. डॉ. इंगवले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

-----

B07521
वाई : देशभक्तिपर गीत सादर करताना विद्यार्थी.
-----

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.