Gold-Silver Rate Today 3 February 2026 : बोला तो भी सुनते नई… आता भोगा… सोन्याचांदीच्या भावात पुन्हा उसळी; आजचे दर ऐकून घामच फुटेल
Tv9 Marathi February 03, 2026 09:46 PM

सगळ्यांना घाम फोडणारे सोन्या-चांदीचे भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत होते. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने घसरण पहायला मिळत होती. मात्र आज (मंगळवार) या उताराला पुन्हा ब्रेक लागला असून, सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. सोमवारी चांदीचा भाव प्रति किलो 2.25 लाखांपर्यंत घसरला होता, मात्र मागील बंदच्या तुलनेत तो आता 21 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढला. तर दुसरीकडे सतत चकाकणारं सोनंही काही कमी नाही. मार्केट उघडताच सोन्याच्या किंमतीतही धाडकन वाढ झाली, ते धाडकन 5 हजार रुपयांनी वर चढल ना राव.

चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळण

आज मंगळवार, खरंतर आठवड्याचा दुसरा दिवस, पण आज जेव्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ट्रेडिंग सुरू झाले, तेव्हा 5 मार्च रोजी एक्सपायरी असलेल्या चांदीच्या फ्युचर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. एका झटक्यात, 1 किलो चांदीची किंमत मागील बंद किमतीपेक्षा 21 हजार रुपयांनी महाग झाली. सोमवारी, एमसीएक्स चांदीची किंमत 2, 36, 261 रुपये इतकी होती. तर आज, म्हणजे मंगळवारी, ती उघडताच ती 21 हजारांनी वाढून थेट 2 लाख 57 हजार , 480 रुपयांवर पोहोचली.

तेजीनंतरही, चांदी उच्चांकापेक्षा इतकी स्वस्त

मंगळवारी झालेल्या तीव्र वाढीनंतरही, चांदीच्या वायदा किमती लाइफ टाइम हाय लेव्हलपेक्षा खूपच स्वस्त आहेत. 29 जानेवारी रोजी एमसीएक्स चांदीच्या किमतीने पहिल्यांदाच 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आणि 4,30,048 रुपये प्रति किलोचा सर्वोच्च टप्पा गाठला होता. या पातळीपासून, चांदीची किंमत अजूनही कमी असून ती 1,62,568 रुपयांनी स्वस्त होत आहे.

सोन्याच्या दरातही मोठी वाढ

एकीकडे चांदी वाढत असताना, सोनं तर कसं मागे राहील. आज सोन्याच्या किमतीतही वाढ झाली, एमसीएक्स सोन्याचा दर सोमवारच्या बंद किंमत 1, 43, 991 रुपये प्रति ग्रॅम वरून सुरुवातीच्या व्यवहारात 1,49,485 रुपयांवर पोहोचला. परिणामी, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर5 हाजर 494 रुपयांनी वाढला

जर आपण सोन्याच्या लाइफ टाइम हाय लेव्हलशी तुलना केली तर ते सध्या खूपच स्वस्त उपलब्ध आहे.मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 2 एप्रिल रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याचा सर्वोच्च दर 1 लाख 93 हजार 096 रुपये इतका होता. चांदीच्या पावलावर पाऊल टाकत होतं. त्यानंतर सोनं चांदीच्या किमतीप्रमाणे सतत घसरत होतं. मात्र मंगळवारी अचानक मोठ्या वाढीनंतरही, ते या पातळीपेक्षा 43 हजार 611 रुपयांनी कमी दराने उपलब्ध आहे.

जळगावच्या सराफा बाजारात काय स्थिती ?

दरम्यान जळगावच्या सराफ बाजारातही सोनं-चांदी वाढलेलं दिसलं. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत तर चांदीचे दर 2 लाख 67 हजार 800 रुपये इतके आहेत. गेल्या तीन दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र आज दजर पुन्हा वाढताना दिसत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.