अपघाताआधी आठ वाजून 37 मिनिटांनी अजितदादांनी विमानातून केलेला अखेरचा फोन कॉल, नेमकं काय म्हणाले?
जयदीप भगत, बारामती February 04, 2026 11:43 AM

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं, मुंबईवरून बारामतीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जात होते, त्यांचं विमान लॅंड होत असतानाच हा अपघात झाला आणि विमानाचा स्फोट झाला, पण त्याआधीच काही वेळ अजित पवारांच्या (Ajit Pawar last phone call) त्यांच्याफोनवरून एका कार्यकर्त्याशी संवाद साधला होता, त्यावेळी देखील ते जिल्हा परिषदेबाबत बोलले होते, श्रीजीत पवार, नातेवाईक व अजित पवारांच्या भावकीतील असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी हा कॉल केला होता, म्हणजेच विमान अपघात होण्याच्या आधी काही मिनीटे आधीचा हा त्यांचा शेवटचा कॉल होता.(Ajit Pawar last phone call)

विमानवरती असावा तेव्हा रेंज नव्हती तेव्हा तो मेसेज पाठवलेला होता, पण जेव्हा लँडिंगसाठी विमान जवळ आलं, ज्या रेंजमध्ये मेसेज मिळतात, दादांनी लगेच फोन केला, इतकी त्यांची कामाची तत्पता होती, विमानात असताना सुद्धा माझ्यासारख्या फार काही महत्त्वाचा नव्हतो मी, पण त्याला लँडिंगच्या टाइमिंगला मला फोन केला होता, तरी प्रत्येक मेसेजला, फोनला, प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा जो त्यांचा स्वभाव होता, त्यानुसार त्यांनी तो कॉल आठ वाजून 37 मिनिटांनी केला होता. (Ajit Pawar last phone call)

एक विषय होता त्याबद्दल आम्ही बोलत होतो. मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती लगेच त्यांनी फोन केला बाबा मी सगळ्याच जाती-धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र आहोत त्याच्यावरती आपण सगळ्यांना नाही देण्याचे नक्की काम करू असं ते म्हणाले होते. आमचं एक मिनिटाचं ते बोलणं झालं होतं. 

नेमका विषय काय होता 

तुम्ही कॉल वर ऐकाल तो विषय असा आहे की, एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना अजित पवारांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला होता. दादा तेव्हा फ्लाईट मध्ये होते. त्यामुळे त्यांना मेसेज उशिरा पोहोचला, आमचा असं म्हणणं आहे की अजितदादा जेव्हा एका ठराविक उंचीवर होते जिथे मोबाइलला रेंज मिळते, तेव्हा त्यांनी मोबाईल मेसेज वाचला आणि मधून त्यांच्याशी संवाद साधावा त्यांना वाटलं असेल, 

शेवटच्या फोन कॉलमध्ये काय बोलणं झालं 

अजित पवार - तुम्हाला माहिती नसतं काय नसतं, काहीतरी उगाच, आम्ही पण सगळ्या जाती धर्माला आम्ही सोबत घेऊन जातो. 

श्रीजीत पवार - मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं.

अजित पवार - मान्य आहे, परंतु तसं नाही, तुमचं सांगणं बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेला उमेदवारी आता दिलेली आहे, तिथं जिथं ओबीसीचा रिझर्वेशन होतं बाकीच्यांना दिलं नाही, इथं पक्षाने दुसरे दिलेले आहेत, त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. 

श्रीजीत पवार - चालेल दादा तुम्हाला जे वाटतं ते निर्णय घ्या, 

अजित पवार - ठीक आहे ओके,

एका विषयावर मी अजित पवार यांच्याशी बोलणार होतो. 8.37 वाजेपर्यंत अजित पवार बोलत होते. 8.19 मिनिटांनी मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवार यांनी मला फोन केला. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला. सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत सगळ्यांना न्याय देण्याचा पण काम करू असं ते म्हणाले, माझ्याशी एक मिनिटाचं अजित पवार यांचं बोलणं झालं. एका कार्यकर्त्यांने आपली भावना अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली. अजित पवार यांचा कार्यकर्त्याशी संवाद चांगला असायचा. शेवटचा संवाद असल्याचा हा कार्यकर्त्याचा दावा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत हा कॉल झाला होता. तुम्हाला माहिती नसतं सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतो आपण असं ते म्हणालेले, माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे, बाकीचे कोणी दिली नाही, इतर पक्षांनी कोणी दिले नाही, आपण ती दिलेली आहे, असंही त्यांनी कॉलवर सांगितलं होतं.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.