डहाणू येथे अजितदादांना अभिवादन
कासा (बातमीदार)ः डहाणू येथे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, भाजपचे भरत राजपूत, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यम ठाकूर, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष करण ठाकूर, अमित घोडा, माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक उपस्थित होते.