WPL Final 2026 : आरसीबीसमोर महाअंतिम सामन्यात 204 धावांचं विक्रमी आव्हान, दिल्ली पहिली ट्रॉफी जिंकणार?
GH News February 06, 2026 12:11 AM

दिल्ली कॅपिट्ल्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम (WPL 2026 Final) सामन्यात धमाका केला आहे. दिल्लीने जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. दिल्लीने20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 203 धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीला आता ट्रॉफी जिंकण्यासाठी 20 ओव्हरमध्ये 204 धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीनेच या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च 202 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.त्यामुळे आरसीबीने या महाअंतिम सामन्यात ऐतिहासिक रन चेज करत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवणार की दिल्ली चौथ्या प्रयत्नात यशस्वी होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.