आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या थराराला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 8 मार्चला वर्ल्ड कप विजेता निश्चित होणार आहे. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ आमनेसामने आहेत. या 20 संघांची 5-5 नुसार 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेचं भारत आणि श्रीलंकेला यजमानपद मिळालं आहे. भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचं 2016 नंतर आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेदरम्यान एकूण 20 संघात 55 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे 55 सामने भारतातील 5 आणि श्रीलंकेतील 2 शहरातील 3 अशा एकूण 8 स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
साखळी फेरीचं वेळापत्रकसाखळी फेरीत प्रत्येक संघाला आपल्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध 1 असे एकूण 4 सामने खेळायचे आहेत. साखळी फेरीत 7 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एकूण 40 सामने खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीत प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील.
बाद फेरीचा थरारसाखळीनंतर 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सुपर 8 फेरीत एकूण 12 सामने खेळवण्यात येणार आहेत. सुपर 8 मधून उपांत्य फेरीसाठी 4 संघ पात्र ठरतील. तर 4 संघांचं पॅकअप होईल. त्यानंतर 4 आणि 5 मार्च रोजी उपांत्य फेरीत 4 संघ भिडतील. त्यातून अंतिम सामन्यासाठी 2 संघ निश्चित होतील. तर 8 फेब्रुवारीला वर्ल्ड कप विजेता कोण असणार? हे स्पष्ट होईल.
2 देश, 7 शहरं आणि 8 स्टेडियमभारतातील 5 स्टेडियममध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. तर श्रीलंकेतील 2 शहरांमधील 3 स्टेडियममध्ये सामन्यांचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
भारत आणि श्रीलंकेतील स्टेडियमदरम्यान साखळी फेरीत पहिले 13 दिवस दररोज 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत पहिल्या दिवसापासून (7 फेब्रुवारी) ते 19 फेब्रुवारीपर्यंत चाहत्यांना दररोज 3 सामने पाहायला मिळणार आहेत.
कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये?आयसीसीने भारताऐवजी श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणामुळे सामन्यांचं आयोजन करण्याची मागणी फेटाळल्याने बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कारतसेच पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध रविवारी 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं जाहीर केलंय. पाकिस्तान सरकार या निर्णयापर्यंत शेवटपर्यंत ठाम राहिल्यास त्यांना 2 पॉइंट्सचा तोटा सहन करावा लागू शकतो.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक
सामने टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?The updated fixtures list for the Men’s #T20WorldCup 2026 📋
More details ➡️ https://t.co/M61nOzx2fF pic.twitter.com/deynITDuV3
— ICC (@ICC)
दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसेच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल/लॅपटॉप आणि टीव्हीवर लाईव्ह सामन्यांचा थरार अनुभवता येईल.