swt513.jpg
22285
कट्टा ः ‘पोवाडा’ सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.
‘आचरा मॅनेजमेंट’चा पोवाडा
‘उडान’ महोत्सवामध्ये प्रथम
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ५ ः मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित ‘उडाण’ या उपक्रमांतर्गत ‘पोवाडा’ सादरीकरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा बुधवारी (ता. ४) डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे झाली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले. त्यांची १८ फेब्रुवारीला मुंबई युनिव्हर्सिट येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रा. भावना मुणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संगीत साथ अनिरुद्ध आचरेकर व कमलाकर पाटकर यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संजय मिराशी, प्रा. नीतेश सारंग, सर्व संस्था चालक यांनी अभिनंदन केले.