Prajakta Gaikwad: प्राजक्ता साकारणार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका; 'भिडेवाडा' चित्रपटाची भव्य घोषणा
Saam TV February 06, 2026 01:45 AM

Prajakta Gaikwad: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात मानाचे स्थान असलेला ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेली ही ऐतिहासिक वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची जिवंत साक्ष आहे. याच प्रेरणादायी वारशावर आधारित ‘भिडेवाडा’ हा सामाजिक आशय असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत असून, महात्मा जोतिराव फुले यांच्या भूमिकेत अभिनेता धीरज जोशी झळकणार आहेत. या भूमिकांची घोषणा होताच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. इतिहासातील या थोर व्यक्तिमत्त्वांना पडद्यावर साकारण्याचे आव्हान प्राजक्ता आणि धीरज समर्थपणे पेलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Manoj Bajpayee: मनोज वाजपेयीचा 'घुसखोर पंडित' अडचणीत; चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय ?

शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी केली असून, सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे सहनिर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यातून चित्रपटाचा सामाजिक आशय स्पष्टपणे अधोरेखित होतो.

Actress On Mandar Devsthali: 'एखाद्याचा डाऊनफॉल...'; शशांकच्या आरोपांनंतर मंदार देवस्थळींच्या मदतीला आली 'ही' मराठी अभिनेत्री
View this post on Instagram

A post shared by MarathiStars (@marathistar)