Ramdas Kadam on Sunil Tatkare : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार गेल्यानंतर सुनिल तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचे रामदास कदम म्हणाले. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचे तटकरे म्हणाले.
अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं. दहा दिवस गेले असते तर काय झालं असतं? असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला. शरद पवार ताबा घेतील या भीतीने वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही असे कदम म्हणाले. सुनील तटकरे विश्वासघातकी. आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठ केलं त्यांना संपवण्याचे काम तटकरे यांनी केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. लोकसभेत त्यांना मी निवडून आणले मात्र योगेश कदम यांना पडण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी रामदास कदम यांनी केला.
आज भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रामदास कदम यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. भास्कर जाधवचा तोल गेलाय त्यामुळे त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भास्कर जाधव यांचा मेंदू सडलेला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज असल्याचे मत कदम यांनी व्यक्त केले. गुहागर मतदार संघात सगळ्या ठिकाणी त्यांना पराभव दिसत असल्याने ते भुंकत आहेत. भुंकणाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असी टीका कदम यांनी जाधव यांच्यावर केली. त्याला 1995 ला आमदारकीची सीट मी मिळवून दिली. शिवसेनेत मी आणल्याचे कदम म्हणाले. माझ्या गावातील भक्ताकडे भास्कर जाधव यांची बायको यायची असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. मी कधी काळी विद्या केली हे सिद्ध करून दाखव असे आव्हान देखील कदम यांनी जाधवांना दिले. भास्कर जाधव यांचा मेंदू सडलेला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज असल्याचे देसाई म्हणाले.