Gold-Silver Rate Today 6 February 2026 : आज तर हद्दच झाली.. चांदी 15 हजार रुपयांनी आणि सोनं चक्क..
Tv9 Marathi February 06, 2026 07:45 PM

Gold Silver Rate : सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप् असतं. पण गेल्या काहीकाळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. पण सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता आणि आज शुक्रवार ( 6 फेब्रुवारीलाही ) तोच कायम दिसत आहे. आजच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात सलग घसरण दिसत आहे. आज सकाळी 9 वाजता एमसीएक्सवर चांदीच्या किमती प्रति किलो 15 हजार रुपयांनी घसरल्या. चांदीची किंमत प्रति किलोसाठी 2 लाख 29 हजार 872 रुपयांवर पोहोचली. एमसीएक्सवर चांदीने 6% कमी सर्किट मारले. एवढंच नव्हे तर सोन्याच्या किमतीतही आज 0.82 टक्क्यांनी घसरण दिसून येत आहे. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 50 हजार 675 रुपये इतकी झाली आहे.

त्याआधी, MCXवर एप्रिल 2026 रोजी संपणारा सोन्याचा वायदा करार गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 1,52,260 रुपयांवर बंद झाला, जो 1,80,779 (प्रति ग्र2) या विक्रमी उच्चांकापेक्षा जवळपास 28 हजार 500 रुपयांनी कमी झाला. मात्र, गुरुवारी स्थानिक बाजारात एमसीएक्स सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली. दरम्यान, एमसीएक्स चांदीच्या किमती 2,46,452 प्रति किलोवर बंद झाल्या, जे त्याच्या सर्वकालीन उच्चांक 4,20,048 प्रति किलोवरून अंदाजे 1 लाख 73 हजार 500 रुपयांनी कमी झाले.

सोन्या-चांदीच्या दरात एवढी घसरण कशी ?

अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने आज सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, सेबी-नोंदणीकृत बाजार तज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, दोन्ही देशांनी संभाव्य अणु कराराबाबत चर्चा सुरू करण्याची घोषणा केली आहे आणि पहिली चर्चा आज (शुक्रवार) होत आहे. या बातमीनंतर, गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित आश्रयस्थानांपासून त्यांचे लक्ष अमेरिकन डॉलरकडे वळवले. मजबूत डॉलरमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. त्याच वेळी, PACE 360 चे चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल म्हणतात की सोने आणि चांदीसह धातूंच्या किमतीत वाढ आता शिगेला पोहोचली आहे. त्यांनी सल्ला दिला की जास्त किमतीत खरेदी केलेल्या पोझिशन्स धारण करणारे गुंतवणूकदार अलिकडच्या सौम्य तेजीत (डेड-कॅट बाउन्स) बाहेर पडू शकतात.त्यांच्या मते, भविष्यात मौल्यवान धातूंच्या किमती आणखी घसरू शकतात आणि हळूहळू त्यांच्या योग्य किंवा वाजवी पातळीकडे (वाजवी मूल्य) जातील, जे सध्याच्या किमतींपेक्षा खूपच कमी मानले जाते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.