मुंबई (मालाड): बदलापूरमधील धक्कादायक घटनेची आठवण करून देणारा प्रकार मुंबईत समोर आला असून, मालाड परिसरातील एका शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन (Mumbai Crime News) केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य (Mumbai Crime News) केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तत्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, आरोपीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यास शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.(Mumbai Crime News)
इतकेच नव्हे तर, तर शाळेच्या बदनामीच्या हेतून उलट शाळेच्या सीईओ यांनी प्रकरण बाहेर न आणण्यासाठी मुलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (३०), आणि शाळेचा सी ई ओ अनंत यज्ञीक (६५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलिसांनी दोघांवर कलम 74, 351(2) बी.एन.एस.2023 सह कलम 10, 17, 21(2) बालकांचे लैगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील शाळा प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.(Mumbai Crime News)
मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचे सीईओ अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74, 351(2) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 मधील कलम 10, 17 आणि 21(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये शाळा प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात असून, शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर मालाड परिसरातील पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करून प्रशासनावरही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास मालाड पोलीस करत असून, अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी नोंदी आणि प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.