आता होणार धिंगाणा! वादग्रस्त राखी सावंत येणार बिग बॉसच्या घरात, वाइल्ड कार्ड एन्ट्री की पाहुणी? जोरदार चर्चा
abp majha web team February 07, 2026 12:43 PM

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात सध्या घडामोडींना वेग आला असून प्रेक्षकांना आता जबरदस्त ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. घरातून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यानंतर आता शोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत. हिंदी आणि मराठी ‘बिग बॉस’मध्ये आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि भांडणांमुळे कायम चर्चेत राहणारी राखी सावंत आता बिग बॉसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. 

अलीकडेच ‘बिग बॉस’ने घरातील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दिव्या शिंदेला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. घरातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या घटनेनंतर या आठवड्यात एकाहून अधिक सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे घरातील वातावरण आणखी तापणार असल्याचे बोलले जात आहे.

राखी सावंतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री 

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये राखी सावंत वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नाही, तर पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. राजश्री मराठीने दिलेल्या अपडेटनुसार, राखी सावंत बिग बॉसच्या घरात जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये बिग बॉसच्या घरातील एक फोटोही समोर आला असून त्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. ती सुमारे 15 दिवस बिग बॉसच्या घरात राहणार असल्याची माहिती आहे. पण नक्की ती पाहुणी म्हणून येतेय की स्पर्धक म्हणून याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राखी सावंत याआधी हिंदी आणि मराठी ‘बिग बॉस’मध्ये आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि भांडणांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. त्यामुळे यावेळी ती कोणत्या सदस्यांना टार्गेट करणार, कोणासोबत वाद घालणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर काय?

दरम्यान, ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख घरातील सदस्यांची कानउघाडणी करणार असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या घरात एकूण 9 सदस्य नॉमिनेट झाले असून त्यामध्ये ओमकार राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, अनुश्री माने, रोशन भजनकर, राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांचा समावेश आहे. आतापर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत आणि दिव्या शिंदे हे तीन सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता चौथ्या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ दररोज रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.