BCCI : वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशीच रोहित शर्मा, विराट कोहलीला BCCI कडून मोठा झटका
Tv9 Marathi February 07, 2026 12:45 PM

आजपासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. टीम इंडियाचा पहिलाच सामना USA विरुद्ध आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर ही मॅच रंगणार आहे. दरम्यान आज वर्ल्ड कप सुरु होत असतानाच टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा झटका मिळाला आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या कुठल्या स्टारला किती पैसा मिळणार, याचा निर्णय झालाय. दरवर्षीप्रमाणे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नव्या सीजनसाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर निर्णय घेतला आहे. एका रिपोर्ट्नुसार, विद्यमान इंटरनॅशनल सीजनसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने 30 खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. यात सर्वात खास निर्णय माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बाबतीत घेतलाय. बोर्डाने कोहली आणि रोहितच डिमोशन केलय. त्यांना A+ ग्रेड मधून डिमोट करुन थेट B ग्रेड मध्ये ढकललय. बीसीसीआयने A+ ग्रेड संपवला असून आता फक्त A,B,C असे तीन ग्रेड ठेवले आहेत अशी चर्चा आहे.

BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 4 ग्रेडवरुन 3 ग्रेडवर आणणार अशी मागच्या काही काळापासून चर्चा होती. रोहितआणि विराट दोघेही आता फक्त एकाच फॉर्मेटमध्ये खेळतात, त्यामुळे ते टॉप ग्रेडचा भाग असणार नाहीत, असही बोललं जात होतं. स्वत: बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी पुष्टि केली होती. सध्या तरी बीसीसीआयने अधिकृतपणे ही लिस्ट जाहीर केलेली नाही.

टॉप ग्रेडमध्ये फक्त तीन खेळाडू

रिपोर्ट्नुसार टॉप ग्रेडमध्ये फक्त तीन नावांना संधी मिळालीय. यात टेस्ट टीमचा कॅप्टन शुबमन गिल, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिग्गज ऑलराऊंडर रवींद्रा जाडेजा यांचा समावेश केलाय. या सर्व खेळाडूंना सर्वाधिक सॅलरी मिळेल. खेळाडूंना मिळणाऱ्या रक्कमेत काही बदल होणार की नाही? या बद्दल स्पष्टता नाहीय. आतापर्यंत A+ ग्रेडमध्ये सर्वाधिक 7 कोटी रुपये मिळायचे. A ग्रेडमध्ये 5 कोटी, B ग्रेडमध्ये 3 कोटी आणि C ग्रेडमध्ये 1 कोटी रुपये मिळायचे. आता टॉप ग्रेडमधील खेळाडूला 7 कोटी मिळणार की 5 कोटी या बद्दल स्थिती स्पष्ट नाहीय.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील 30 नावं

ग्रेड-A : शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा

ग्रेड-B : विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, वॉशिंगटन सुंदर, हार्दिक पंड्या, केएल राहुल, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर.

ग्रेड-C : तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, संजू सॅमसन, रिंकू सिंह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, आकाश दीप, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, ध्रुव जुरैल, अभिषेक शर्मा, नीतीश कुमार रेड्डी, ऋतुराज गायकवाड़, रवि बिश्नोई आणि साई सुदर्शन.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.