सासवड शहर, ता. ६ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाच्या मैदानावर कापूर व पिंपरण देशी प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. बी. यु. माने वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. अनिल झोळ, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे, आयक्यूएसीचे प्रमुख बी. एल. शिंदे, डॉ. विद्या पाटणकर, वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील जगताप विविध विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. सुधीर रोकडे, कनिष्ठ विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विकास मुजुमले, व्यवसाय विभागाचे प्रा संजय लांडगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख व वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शुभम ठोंबरे यांनी वृक्षारोपण करण्याआधी या वृक्षांचे महत्त्व सांगून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रवी जाधव मीरा चिकणे, विनोद रणपिसे उपस्थित होते.
12534