समीक्षक -संदेश वाहाणे
मराठी सिनेसृष्टीत कायम निरनिराळे प्रयोग होत असतात. यात कधी विनोदी चित्रपट असतात तर कधी स्त्री भाव विश्वाचा ठाव घेतला जातो. कधी भयपट तर कधी रहस्यमय चित्रपटांचा विषय हाताळला जातो. असाच एक आगळावेगळा विषय प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. झी ५ वर 'देवखेळ' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. यात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहेत. कशी आहे ही सीरिज पाहूया.
काय आहे कथा?कोकणातल्या प्रत्येक गावात वेग्वेगळ्या प्रथा असतात. कोकणात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही होळी म्हंटली की शंकासुर आलाच. होळीला शंकासुराची पूजा केली जाते. मात्र एका गावात होळीची पूजा झाल्यानंतर शंकासुर एका पापी व्यक्तीला त्याच्या पापाची शिक्षा देतो म्हणजेच त्याचा जीव घेतो. १५ वर्षांपासून ही प्रथा सुरू असते. त्यानंतर गावात एंट्री होते ती इन्स्पेक्टर विश्वासची. आता गावात खरंच शंकासुर येतो का हे सत्य तो शोधून काढणार आहे.
कशी आहे सीरिज?बऱ्याचदा आपला देवभोळेपणा अंधश्रद्धा आणि रूढीप्रथेला खरं समजून बसतो, त्याचा फायदा उचलून काही चुकीच्या गोष्टी होत असल्या तरी आपण वास्तविकतेचा शोध लावायला जात नाही. 'देवखेळ' या नवीन वेब सिरीज मध्ये या गोष्टी वर प्रकाश टाकण्यात आलाय. कथा साधी सोपी आहे पण ती ज्या पद्धतीने मांडली आहे ती गोष्ट आपल्याला कंटाळा येऊ देत नाही. जसे जसे एपिसोड पुढे जातात तशा गोष्टी आणखी किचकट आणि अवघड होत जातात. कथा आपल्याला भटकवत राहते, बऱ्याच शक्यता तयार करते पण खून कुणी केला हा सस्पेन्स शेवटपर्यंत राहतो जी याची जमेची बाजू आहे.
अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचं काम कौतुकास्पद आहे. त्यांचा स्क्रीनवरचा वावर या कथेला आणखी मजबूत बनवतो. त्यात महत्वाचं म्हणजे शंकसूराची प्रतिमा चुकीची दाखवलीय असं म्हटलं जातंय पण असं कुठेही पाहताना जाणवत नाही. आणि सिरीज बघितल्यावर तुम्हाला पण असं वाटणार नाही. उलट शंकासुर आणि कोकणातल्या प्रथांबद्दलची जास्तीची माहिती या सीरिजमधून मिळतेय. ही उत्कंठा वाढवणारी 'देवखेळ' वेब सिरीज तुम्ही मराठी zee5 वर बघू शकता. नक्की वेळ काढून पाहावी अशी ही सीरिज आहे. एक वेगळं जग आणि बुद्धीला खाद्य देण्याचं काम ही सीरिज करते.
प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जबरदस्त केमिस्ट्री; 'बिन लग्नाची गोष्ट' ओटीटीवर होतोय ट्रेंड; कुठे पाहाल?