जळगाव : लग्नासाठी तब्बल एक लाख ७० हजार रुपये स्वीकारून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात (Jalgaon Child Marriage Case) मुलीचे आई-वडील, बहीण, आत्या, मध्यस्थी महिला, एक तृतीयपंथीय, तसेच मुलीचा पती अशा सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
तपासादरम्यान पहिल्या मुलीचे लग्न लावताना वराने त्याचा मित्रही वधू शोधत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहिल्या मुलीच्या बहिणीचेही लग्न लावून देण्यात आले आणि त्या मोबदल्यातही एक लाख ७० हजार रुपये स्वीकारले होते. दुसऱ्या मुलीचे लग्न लावून देताना ती अल्पवयीन असल्याचे उघड झाले.
Ratnagiri Cricket Player : खेळ रंगात असतानाच नियतीचा घाला! पंचांसमोरच क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या धक्क्याने अंत, रत्नागिरीवर शोककळासंबंधितांनी मुलगी १८ वर्षांची असल्याचे सांगून वराची दिशाभूल केली होती. त्यामुळे आई-वडील, बहीण, आत्या, मध्यस्थ महिला व तृतीयपंथीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तसेच मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री न करता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून संबंधित तरुणावरही गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास तालुका पोलिसांकडून सुरू असून, अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.