पिंपरी, ता.७ ः सकाळी पायी चालण्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना यमुनानगर येथील गोळवलकर गुरुजी ‘स्केटिंग ग्राउंड’च्या मागील बाजूस असलेल्या तसेच महिला जिमच्या शेजारील सार्वजनिक शौचालयाच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील खुल्या जिमचा वापर नागरिक व्यायामासाठी करतात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा दररोज देखील या मैदानावर भरते या सर्व नागरिकांना शौचालयातील दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या शौचालयाची स्वच्छता व देखभाल नियमित करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे स्वच्छ हवा घेण्यासाठी आलेल्या लोकांना ही दुर्गंधी टाळता येईल. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या समस्येची दखल घेणे घ्यावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक दिनेश कुलकर्णी यांनी केली आहे.