Sarvam: भारताचा एआयमध्ये डंका; बहुभाषिक एआय मॉडेल सर्वम व्हिजन लाँच, अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
Tv9 Marathi February 08, 2026 08:45 PM

AI Model Sarvam Vision : एआय तंत्रज्ञानाची चर्चाच नाही तर सर्वत्र क्रेझ आहे. एआय झपाट्याने अनेक क्षेत्र व्यापत आहे. एआय हे आधुनिक तंत्रज्ञान असून त्याचा वापर विविध क्षेत्रात होत आहे. केंद्र सरकार पण एआयच्या वापरात मागे नाही. केंद्र सरकारने बहुभाषिक दस्तऐवज कृत्रिम बुद्धिमत्ता एआय मॉडेल सर्वम व्हिजनचे अनावरण केले आहे. हे भारताचे पहिले स्वदेशी एआय मॉडेल आहे. यामुळे देशातंर्गत एक इकोसिस्टिम तयार होईल. काय आहे हा प्रकल्प आणि काय आहे हे मॉडेल?

भारताची क्रांतीकारक झेप

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वम व्हिजन या पहिल्या स्वदेशी एआय मॉडेलविषयी ट्विट केले आहे.त्यानुसार हे मॉडेल या क्षेत्रात ठोस परिणाम घडवून आणेल.देशाच्या एआय मिशनंतर्गत सर्वमने सादर केलेल्या प्रगत मॉडलचे तांत्रिक परिक्षण झाले आहे. हे मॉडेल कठोर परीक्षणावर खरं उतरलं आहे समीक्षकांनी सर्वमचे कौतुक केल्याचे ते म्हणाले. देशातील हुशार आणि तरुण अभियंते हे साहित्य विज्ञान, आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांमध्ये नवीन कल्पनांवर जिद्दीने काम करत आहेत. जागतिक स्तरावर हे मॉडेल क्रांतीकारक ठरल्याचा दावा त्यांनी केला.

Our sovereign model strategy is delivering results.

Even the most critical reviewers are praising the technologically advanced model released by Sarvam as a part of our AI mission.

In parallel, our smart young engineers are working on innovations in materials science,… https://t.co/PA8zR4xq9d

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw)

सर्वम एआयचे सर्वम व्हिजन

भारताचे एआय स्टार्टअप सर्वम एआयने सर्वम व्हिजन नावाचे प्रगत मल्टिमॉडल लाँच केले. हे मॉडेल दस्ताऐवजाची बुद्धिमत्ता, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) देशाच्या विविध भाषा, लिपी दृश्य भाषा समज (Visual Language Understanding) यासाठी सक्षम ठरले आहे.

विशेष म्हणजे हे नवीन एआय मॉडेल हे जेमिनी 3 प्रो, GPT-5.2 सोबतच आघाडीच्या इतर एआय मॉडेलपेक्षा सरस ठरल्याचा दावा करण्यात येतो. सर्वम एआयच्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक सर्वम व्हिजन बहुभाषिक मॉडेल आधुनिक इंग्रजी दस्तऐवज प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे. भारताचे बहुतांश ज्ञान हे विविध ऐतिहासिक शिलालेख, ताडपत्रावरील मजकूर, जुने ग्रंथ, अभिलेखांमध्ये दडलेले आहे. हे प्रगत तंत्रज्ञान त्याचा गाभा समजून घेऊन त्या काळातील ज्ञान जगासमोर आणणार आहे.

सुरुवातीच्या चाचपणीत सर्वम व्हिजन या एआय मॉडेलने मराठी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, उर्दू, आसामी. हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु आणि इतर अशा 22अधिकृत भारतीय भाषांमध्ये OCR कामगिरीत आघाडीच्या एआय मॉडेल्सपेक्षा चांगले परिणाम दाखवले आहेत. यामुळे दस्तावेजांची अचुकता आणि विश्वसनीयता समोर येणार आहे.  या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार असल्याचे समोर आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.