Rohit Sharma - Suryakumar Yadav Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली असून भारताने अमेरिकेविरुद्ध २९ धावांनी विजय मिळवत मोहिमेची सुरुवात केली. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. यावेळी प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
यातही सामन्यासाठी सर्वांना भारताचा २०२४ टी२० वर्ल्ड कप विजेत्या रोहित शर्माचीही (Rohit Sharma) झलक पाहायला मिळाली. रोहित हा यंदाच्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी (T20 World Cup) ब्रँड अँबिसिडर आहे.
T20 World Cup: '७७ वर ६ विकेट्स होत्या, तेव्हा फक्त मलाच माहिती की...', सूर्यकुमार अमेरिकेविरुद्धच्या विजयानंतर काय म्हणाला?तसेच पहिल्यांदा असं होत आहे की टी२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा खेळत नाही. यापूर्वी झालेल्या सर्व नऊ टी२० वर्ल्ड कपसाठी रोहित भारतीय संघाचा भाग होता. मात्र यंदाचा टी२० वर्ल्ड कप त्याच्यासाठी खास आहे. यंदा तो ब्रँड अँबिसिडरच्या भूमिकेत आहे. यामुळे तो त्याच भूमिकेत शनिवारी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता.
यावेळी जेव्हा तो भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आणि भारतीय संघातील खेळाडूंना भेटला तेव्हाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की सूर्यकुमार नाणेफेकीसाठी जात होता, तेव्हा रोहित त्याला भेटला. यावेळी सूर्या त्याला म्हणाला, 'पटकन सांग, मी फलंदाजी करू की गोलंदाजी?' त्यावेळी रोहित त्याला म्हणाला, 'फिल्डिंग कर, पागल आहेस काय?'
व्हिडिओमध्ये पुढे दिसते की भारतीय संघातील खेळाडू ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीत उभे आहेत आणि रोहित मैदानात होता, त्यावेळी खेळाडूंना तो म्हणाला, 'विचित्र वाटतंय रे, तिथून इथे, हे विचित्र आहे.'
रोहित पुढे त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, 'इथे येऊन नेहमीच छान वाटतं. इथल्या लोकांना त्यांचं क्रिकेट आवडतं. मुंबई म्हणजे ऊर्जा. मला म्हणायचंय की इथे कधीच निराशा होत नाही.'
रोहितने पुढे भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देत मजा घेण्याचा सल्ला दिला. त्याने संघातील खेळाडूंची भेटही घेतली. त्याने म्हटले की सामन्याचा आनंदही घ्यायला हवा. हे क्षण परत येत नाहीत. याशिवाय तो म्हणाला, 'भारतात खेळणं सोपं नाही.'
T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEOत्याने असंही सांगितलं की वानखेडेवर नेहमीच फलंदाजांसोबत गोलंदाजांनाही मदत मिळते. रोहितने शेवटी असंही म्हटलं की खेळाडू म्हणून मैदानात न उतरला ब्रँड अँबिसिडर म्हणून मैदानात येतानाच्या भावना खूप वेगळ्या होत्या.
View this post on Instagram
रोहितचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर दोन तासातच ५ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत आणि ६ मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत.