'बिग बॉस मराठी'च्या घरात धक्कादायक एलिमिनेशन; गेम हलक्यात घेणं पडलं महागात, 'या' स्ट्राँग प्लेयरची एग्झिट
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क February 09, 2026 10:13 AM

Bigg Boss Marathi Season 6: 'BIGG BOSS मराठी – भाऊचा धक्का'च्या एपिसोडमध्ये घरात मोठा धक्का बसला. डेंजर झोनमध्ये दोन सख्खे मित्र आले आणि त्यापैकी एकानं घरातून एग्झिट घेतली. ओमकार राऊत (Omkar Raut) आणि आयुष संजीव (Aayush Sanjeev) दोघेही डेंजर झोनमध्ये आले. त्यानंतर ओमकार राऊत घराबाहेर गेला. 

रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणानं सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं, तर घरात शांततेसोबतच अस्वस्थतेचं वातावरणही निर्माण झालं. आता येत्या आठवड्यात घरात सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण घरात काहीतरी असं घडणार आहे, ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल, सदस्यांना मोठं सरप्राईज मिळणार आहे. त्याचसोबत घरात कोणते टास्क रंगणार? कोण घराचा कॅप्टन ठरणार? कोण होणार नॉमिनेट? कोण घरात टिकणार आणि कोण बाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या 'भाऊचा धक्का'मध्ये रितेश भाऊंनी आपल्या खास स्टाईलमध्ये रुचिताला थेट समज देत रुचिता–दिपालीमधील वादावर भाष्य केलं. करण आणि प्राजक्ताच्या कमेंट्रीवरही रितेश भाऊंची स्पष्ट टिपणी पाहायला मिळाली. विशाल आणि टोळीच्या खेळीचं कौतुक करताना, टोळीच्या रणनितीला दाद देण्यात आली, तर सचिनचे विचार रितेश भाऊंच्या मनाला भिडले आणि हा क्षण घरासाठी भावनिक ठरला.                                                                                                                             

ओंकारच्या एक्झिटनंतर आता पुढील आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोण सुरक्षित राहणार, कोण असुरक्षित होणार? पुढच्या नॉमिनेशनमध्ये कोणाची नावं पुढे येणार आणि पुढचा प्रवास कोणाचा थांबणार? घरात नवी समीकरणं तयार होणार की जुन्याच वादांना उधाण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं पुढचा 'राडा' नेमका कोण घालणार? या सगळ्याची उत्तरं लवकरच 'BIGG BOSS मराठी'च्या आगामी एपिसोड्समध्ये मिळणार आहेत.                                                

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.