RSSच्या कार्यक्रमात सलमान खानसमोरच मोहन भागवतांचं भाईजानच्या फॅशनवर वक्तव्य; म्हणाले...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क February 09, 2026 10:43 AM

Mohan Bhagwat On Salman Khans Fashion: यंदाचं वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (Rashtriya Swayamsevak Sangh) शताब्दी वर्ष आहे. आरएसएसच्या (RSS) 100व्या  वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील (Mumbai News) नेहरू सेंटर इथे संघाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह बॉलिवूड (Bollywood News) दिग्गजांनीही हजेरी लावली होती. पण, सेलिब्रिटींच्या गर्दीत एका सेलिब्रिटीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या. तो सेलिब्रिटी चेहरा म्हणजे, बॉलिवूडचा किंग खान सलमान खान (Salman Khan). 

शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत  मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या उपस्थितीत 'नवे क्षितीज' या नावानं व्याख्यानमालेला सुरुवात झाली. यावेळी सलमान खान उपस्थित होता. मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरांचं सत्र पार पडलं. यावेळी समाज एखाद्या गोष्टीचा स्वीकार कसा करतो, हे समजावून सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सलमान खानचं उदाहण दिलं. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी मोहन भागवतांनी सलमान खानचं नाव घेतलं आणि त्याच्या फॅशनबाबत वक्तव्य केलं, त्यावेळी स्वतः सलमान खान श्रोत्यांमध्ये उपस्थित होता. 

सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणात मोहन भागवत म्हणाले की, "समाजात फॅशन आणि ट्रेंड्स हे प्रभावातून निर्माण होतात. सलमान खान काय घालतो? महाविद्यालयीन विद्यार्थी तेच परिधान करतात. तो ते का घालतोय? हे कुणालाच माहीत नसतं, पण तो घालतो म्हणून ते लोकप्रिय होतं. मग ती गोष्ट चांगली असो वा वाईट, फॅशनमुळे ती पसरते...", असं मोहन भागवत म्हणाले. 

"जे लोक फॅशन किंवा ट्रेंड तयार करतात, त्यांना समाजात प्रभावशाली मानले जाते. अशा लोकांना आपल्या भाषेत 'महाजन' म्हणतात. समाज ज्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यांचा आदर करतो, अशा लोकांचे अनुकरण केले जाते", असं स्पष्टीकरणंही मोहन भागवत यांनी दिलं. 

दरम्यान, आरएसएसच्या 100व्या  वर्धापन दिनानिमित्त सलमान खानच्या उपस्थितीवरुन अनेकांनी टीकाही केली आहे. तसेच, बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगलेली. 

 

सलमान खानच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रसाद ओकची प्रतिक्रिया, म्हणाला, 'त्यानं संघाच्या कार्यक्रमात येणं, हे एकप्रकारे..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.