Dharashiv ZP Election Results 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया शनिवारी (7 फेब्रुवारीला) पूर्ण झाली होती. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले होते. दरम्यान, यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात नेमकं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होते. कारण दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे कल हाती येत आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांची प्रतिष्ठा पणाा लागली होती. भाजप आणदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता. जवळा गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत होत्या.
सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीआधीच महायुतीच्या 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Winner Candidate List 2026)
जिल्हा परिषदेचे नाव- धाराशिव
एकूण जागा - 55
एकूण उमेदवार - 234
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार
शिवसेना उबाठा : 44
भाजप: 41
शिवसेना : 23
राष्ट्रवादी : 16
राष्ट्रवादी शरद पवार: 12
काँग्रेस: 16