Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी दि. 09 फेब्रुवारी रोजी जाहीर होत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सरासरी 61.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र दिसून आले. आता सर्व उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद झाले असून, आज सकाळी निकाल स्पष्ट होणार आहे. मतमोजणीला सुरुवात होताच विजयी उमेदवारांची नावे एकामागोमाग जाहीर केली जाणार आहेत.
जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सकाळी 10.00 वाजता एकाच वेळी मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक पंचायत समिती गणासाठी 10 ते 14 टेबल्स लावण्यात आले असून, मतमोजणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे.
सावंतवाडी: 69.54%
वेंगुर्ला:69.03%
कुडाळ: 60.08%
दोडामार्ग: 59.83%
कणकवली: 59.81%
मालवण: 58.90%
देवगड: 57.12%
वैभववाडी: 54.79%
एकूण मतदार: 561,105
मतदान झाले: 347,749
पुरुष मतदार: 180,327
महिला मतदार: 167,422
जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, या सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. उर्वरित उर्वरित 42 जिल्हा परिषद जागांसाठी 115, तर 83 पंचायत समिती जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद बिनविरोध उमेदवार
१) खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप)
२)बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
४)पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)
५)बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)
६) पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप)
७)किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)
८) कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)
कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)
६) नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)
देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
७)पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
८)नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
९)बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
१३) कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)
वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
१४) आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)
मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
१५) आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
१६) शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
१७) कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)