Yavatmal Crime News : यवतमाळच्या घाटंजी (Ghatanji) येथे गुरू-शिष्य नात्याला काळीमा (Crime News) फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार (Yavatmal Crime News) केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीसात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली आहे.
Yavatmal Crime News : रात्री बसस्थानकावर नेले आणि चारचाकी वाहनात....
मुख्याध्यापकाणे मोबाईलवरून बोलावून रात्री बसस्थानकावर नेले आणि चारचाकी वाहनात अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे. याआधीही शाळेतील डिजिटल खोलीतही अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप या मुख्याध्यापकावर आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली असून पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेने शिक्षण क्षेत्रासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
यवतमाळच्या पुसद शहरातील इटावा वार्ड परिसरातील पार्किंगमध्ये असलेल्या एका ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली. या आगीत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण वाहनाला वेढा घातला. आग एवढी तीव्र होती की काही क्षणांतच ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही ट्रॅव्हल्स संभाजीनगर येथील जावेद शेख निसार शेख यांच्या मालकीची असून ती पुसद ते पुणे या मार्गावर धावणार होती.
Gondia Crime : पुरी-इंदोर हमसफर एक्सप्रेस रेल्वे गाडीतुन 5 लक्ष 55 हजार किमतीचा 27 किलो गांजा जप्त
रेल्वे गाडीतून गांजाची तस्करी करीत असलेल्या तरुण प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याकडून 5 लक्ष 55 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून ही कारवाई आमगाव ते गोंदिया दरम्यान धावत्या गाडीत करण्यात आली आहे. गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यातील पथक दुर्ग (छत्तीसगड) येथून पुरी-इंदोर हमसफर एक्स्प्रेसमध्ये गुन्हेगारांवर नजर व बॅग तपासणी करीत असताना आमगाव रेल्वे स्थानक दरम्यान त्यांना एसी कोच मध्ये प्रवास करणारा तरुण संशयितरीत्या हालचाली करीत असताना दिसून आला. यावर पथकाने त्याला नाव विचारले असता त्याने सुरेंद्र रमेशचंद्र नायक (23, रा. इटावा, उज्जैन-मप्र) असे नाव सांगितले व पळून जाण्याचा केला. मात्र पथकाने मोठ्या शिताफीने त्याला पकडले व त्याच्याकडील काळ्या रंगाची कॉलेज बॅग व मोरपंखी रंगाच्या ट्रॉली सुटकेसची पाहणी केली. यामध्ये पोलिसांना 5 लक्ष 55 हजार 300 रुपये किमतीचा 27 किलो 735 किलो गांजा जप्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या