पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम February 09, 2026 12:13 PM

Pune ZP Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकींचा आज निकाल आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. कोण सत्ता राखणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार? भाजपला जिल्हा परिषदेवर आपली सत्ता मिळवता येणार का? (Pune ZP election result 2026 live update) याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.(Pune ZP election result 2026 live update)

पुणे जिल्हा परिषद 

एकूण जागा - ७३
एकूण उमेदवार - २९९
अपक्ष-२९९ पैकी ६१ 

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?

राष्ट्रवादी काँग्रेस - ७२
भाजप - ५८
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - ७
काँग्रेस - १५
शिवसेना - ३९
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - २६
अपक्ष - ६१

पंचायत समितीची माहिती

जिल्ह्यातील एकूण पंचायत समित्या- १३
प्रत्येक  पं.समितीत किती जागा-  १४६
प्रत्येक पं.समितीत किती उमेदवार- ५२८

जिल्ह्यातील या लढतींकडे सर्वांचं लक्ष

मुळशी पिरंगुट - भूगाव गट -
या गटामध्ये मागील पंचवार्षिकमध्ये एकत्रित निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

वेल्हे विंझर जिल्हा परिषद गट
या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल नलावडे, भाजपाकडून शिवराज शेंडकर तर पुणे जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर यांचे चिरंजीव अनंता दारवटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात  प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत रिंगणात असून राष्ट्रवादीचे नलावडे भाजपाचे शेंडकर तर शिवसेनेकडून दारवटकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

भोर जिल्हा परिषद गट उत्रोली - कारी
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि एक वेळी पंचायत समिती सदस्य असलेले रणजीत शिवतरे आणि भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपात होते यांच्यामध्ये चूरशीची लढत होणार आहे

पुरंदर बेलसर - माळशिरस गट
बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते व काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांच्यासह शिवसेनेचे रमेश इंगळे,भाजपचे अजय इंगळे,शिवसेना (उबाठा)चे अमोल कामठे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे.

इंदापूर
वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवीत असून या ठिकाणी पूर्वी राष्ट्रवादीकडूनच पंचायत समिती सदस्य म्हणून असलेले सतीश पांढरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.
 
दौंड केडगाव बोरीपार्धी गट -
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव  तुषार थोरात विरुद्ध भाजपाचे बोरीपार्धीचे येथील माजी आमदार कै. काकासाहेब थोरात यांचे नातू तथा भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांची चिरंजीव अभिषेक थोरात यांच्यामध्ये चुरशीची लढत

 शिरूर वडगाव मांडवगण फराटा  गट -
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार विरुद्ध भाजपाचे वडगाव रासाई येथील सरपंच सचिन शेलार व स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तसेच घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांच्यामध्ये चुरशीची तिरंगी लढत..

हवेली खेड शिवापूर खानापूर गट
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पांगारे यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य पूजा पारगे विरुद्ध  शिवसेना शिंदे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्या पत्नी रुपाली रमेश कोंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत.

जुन्नर नारायणगाव - वारूळवाडी गट -
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच महेश शेळके यांच्या पत्नी व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियांका  शेळके व शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. नारायणगाव - वारूळवाडी गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

आंबेगाव पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जारकरवाडी गट –
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी सहकारमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील विरुद्ध शिवसेनेचे अरुण गिरे यांच्यामध्ये चुरशीची लढत.. दोघांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. अरुण गिरे यांनी नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. या गटात भाजपचे किरण वाळुंज व एक अपक्ष हि रिंगणात आहे.

खेड
 आंबेठाण-पाईट या जिल्हा परिषद गटात तब्बल वीस वर्ष हा गट ताब्यात ठेवणारे शरद बुट्टेपाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टेपाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी आणि बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांच्या आई राजश्री जैद या शिवसेना ( उबाठा ) माध्यमातून निवडणूक लढवत आहे.तर शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांच्या चुलत भावजय निशा गोरे निवडणूक लढवित आहे. त्यामुळे येथे तालुक्यातील सर्वाधिक चुरशीची लढत पहायला मिळत आहे.

भोरचे माझी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा या उझोली- कारी गावातून भाजपकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचा सामना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी आहे.

शिरवळचे माझी आमदार अशोक पवार यांची पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.

जुन्नर तालुक्यातील बोरी- खोडे येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि
जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार यांनीअपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आणलं आहे.

आंबेगावात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे–पाटील आणि अरुण गिर यांच्या अडचणी वाढल्या आहेत कारण या ठिकाणी
शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र लढत आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभ्या आहेत.

खेड तालुक्यात भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांची पत्नी सुजाता बुट्टे पाटील यांच्या विराेधात आमदार बाबाजी काळे यांचा भाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात आहे.

दौंड तालुक्यातील खडक्री येथून दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगताप यांचे पुत्र वीरेंद्र हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच बोरीभाडे येथून माजी आमदार रामशेठ शिरोल यांच्या पुत्र ऋषभ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलगी अंकिता पाटील या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. येथून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. कुंभारगाव दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रेयस यालाही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

विजयी उमेदवारांची नावे 

(टीप - निकाल लागायला सुरूवात होईल तसे अपडेट होतील)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.