Sindhudurg ZP Election Result 2026 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजचा सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६, हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे. एका बाजूला ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे, तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या दुर्मीळ योगायोगामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्ती आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या 42 आणि पंचायत समितीच्या 83 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून आठही तालुक्यांच्या ठिकाणी सुरू होणार आहे. आज तब्बल 359 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीतून बाहेर येणार असून, सत्ताधारी आणि विरोधक यापैकी कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Sindhudurg ZP Election Result 2026 : जिल्हा परिषदेच्या 8 जागा बिनविरोध
विशेष म्हणजे, विजयाचे साकडे घालण्यासाठी अनेक दिग्गज उमेदवारांनी पहाटेच भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होत मतमोजणी केंद्रांकडे प्रयाण केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजचा दिवस सिंधुदुर्गच्या पुढील पाच वर्षांच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत उमेदवारांची धाकधूक वाढत जाणार असून, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मतमोजणी केंद्राबाहेर पाहायला मिळणार आहे. दुपारपर्यंत गुलाल कोणाचा आणि देवीचा आशीर्वाद कोणाला मिळणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 8 जागा तर पंचायत समितीच्या 17 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
बंडखोरीचा फटका : अनेक मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांनी सत्ताधारी पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे.
कसोटी : हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानला जात आहे.
जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवार गुलालाची उधळण करत थेट आंगणेवाडीत देवीच्या दर्शनासाठी पोहोचण्याची शक्यता आहे.
एकूण उमेदवार : 359
जिल्हा परिषद : 115
पंचायत समिती : 244
मतदान : 5,61,105 पैकी 3,47,749 मतदारांनी कौल दिला
मतमोजणी केंद्रे : 8 तालुक्यांच्या ठिकाणी
१) खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप)
२)बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
४)पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)
५)बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)
६) पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप)
७)किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)
८) कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)
१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)
६) नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)
७)पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
८)नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
९)बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
१३) कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)
१४) आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)
१५) आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)
१६) शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)
१७) कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)