बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.
ओमकार राऊतने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला.
'बिग बॉस मराठी 6'मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत आली आहे.
'बिग बॉस मराठी 6' मधून चौथ्या आठवड्यात दोन सदस्य बाहेर पडले. सर्वात आधी घरातील सदस्यांना धमकी दिल्यामुळे दिव्या शिंदेला घर सोडाव लागले. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर ओमकार राऊतने घराचा निरोप घेतला. ओमकारच्या जाण्याने घरातील सदस्य खूपच दुःखी झाले. अशात आता बिग बॉसने चाहत्यांना भन्नाट सरप्राइज दिले आहे. अखेर बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीनची एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची शोमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे.
View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "आली Entertainment ची लहर, BIGG BOSS मराठीच्या घरात पसरणार राखीचा कहर!" बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते तुफान कमेंट्स करताना दिसत आहे. आता खऱ्या अर्थाने 'बिग बॉस मराठी 6' झाल्याचे प्रेक्षक बोलत आहे. आता राखी सावंत घरातील कोणत्या सदस्याचा पर्दाफाश करते, कोणाला रडवते आणि कोणासाठी लढते हे सर्वच पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
राखी सावंत बिग बॉसच्या घरात नागिन अवतारात येते. तिला पाहून घरातील सदस्य खूपच खुश आणि आनंदी होतात. मात्र घरात येता क्षणी राखी एका सदस्याला चांगलीच टार्गेट करते. त्यामुळे राखीच्या येण्याने घरातील सदस्यांचे नक्कीच टेन्शन वाढले आहे. घरात एन्ट्री घेताच राखी सावंत राकेश बापटला "माझा नागोबा" बोलते. सर्वजण हसू लागतात. त्यानंतर ती तन्वीकडे जाते. बोलते, "तन्वी कोलसे..." तेव्हा तन्वी बोलते, "तन्वी कोलते..." त्यावर राखी म्हणते की, "तन्वीकोलते आता मी तुला मस्त सोलते..." बिग बॉसच्या घरात येताच राखी सावंतने तन्वी कोलतेशी पंगा घेतला आहे.
View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
राखी सावंत बिग बॉसच्या घरात जाताना म्हणते की, "राखी जाणार, गेम पालटणार. माझ्याशिवाय 'बिग बॉस मराठी' अधूरे आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होणार. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तेव्हा फक्त तिची मर्जी चालणार आहे..." आता राखी नावाचे वादळ घरात कोणता राडा घालणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, संगीत विश्वावर शोककळा