निवृत्तीनंतर कर्जाचे पर्याय: निवृत्तीनंतर पगार थांबतो, तुमचा घरातील खर्च सुरुच राहतो. जर एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतरही दैनंदिन खर्च येत राहिला तर त्यांना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय, वाढत्या वयामुळं अनेकदा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत, जेव्हा आर्थिक गरजा निर्माण होतात, तेव्हा लोक बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतात. नियमित उत्पन्न कमी झाल्यामुळे बँका बहुतेक प्रकरणे नाकारतात. जर तुम्हीही या काळातून जात असाल आणि तुम्हाला अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल, तर वैयक्तिक कर्जाव्यतिरिक्त इतर पर्याय आहेत. योग्य माहिती आणि नियोजनाने आर्थिक ताण कमी करता येतो. निवृत्तीनंतरही आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे याबाबतची माहिती पाहुयात.
जर तुमच्याकडे बँकेत मुदत ठेव असेल, तर गरज पडल्यास तुम्ही ती न मोडता कर्ज घेऊ शकता. बँका एफडीला तारण म्हणून मानून ही सुविधा देतात. व्याजदर एफडीवरील परताव्यापेक्षा थोडा जास्त असतो, परंतु प्रक्रिया अगदी सोपी आहे. कागदपत्रे खूप सोपी असल्याने, हा पर्याय निवृत्त व्यक्तींसाठी देखील योग्य मानला जातो. बँका सामान्यतः तुमच्या एफडी रकमेच्या 80 टक्के पर्यंत कर्ज मंजूर करतात.
निवृत्त व्यक्तींसाठी सोने कर्ज देखील एक चांगला पर्याय असू शकतो. तुमचे सोन्याचे दागिने तारण ठेवून तुम्ही कमी कालावधीत कर्ज मिळवू शकता. व्याजदर सामान्यतः असुरक्षित वैयक्तिक कर्जांपेक्षा कमी असतात, ज्यामुळे ते अधिक किफायतशीर बनतात. तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्याने तुमचे सोने सुरक्षित राहते.
जर तुमच्या नावावर घर किंवा इतर मालमत्ता नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असेल, तर तुम्ही कर्ज मिळविण्यासाठी ते गहाण ठेवू शकता. बँका याला सुरक्षित पर्याय मानतात, त्यामुळे व्याजदर सामान्यतः वैयक्तिक कर्जापेक्षा कमी असतो.
आणखी वाचा