शाहू वाचनालयाच्या वतीने शिवरायांना अभिवादन
esakal February 21, 2026 12:45 AM

पिंपरी, ता. २० ः शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विलास जेऊरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. मनिषा पाटील यांनी शिवरायांचा पाळणा सादर करून उपस्थितांच्या मनात शिवभक्तीची भावना जागृत केली. गणेश सहाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेत उपस्थितांना शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग ओघवत्या शैलीत सांगितले. रवींद्र अडसूळ आणि तेजश्री घेवारी यांनी संयोजनात पुढाकार घेतला. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. आभार प्रदर्शन राजाराम वंजारी यांनी केले.
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.