कोणतीही ओळख नसताना बॉलिवूडमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते कादर खान हे ९०च्या दशकातील अनेक चित्रपटात दिसले. ते अनेकदा हिरो किंवा हिरोईनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका त्यांनी लिलया साकारल्या. मात्र त्यांची बॉलिवूडचे बिग बी असलेले अमिताभ बच्चन यांच्याशी चांगली मैत्री होती. तब्बल २० वर्ष ते दोघे एकमेकांचे मित्र होते. दोघांनी बेनाम (१९७४), हम (१९९१) यासारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. मात्र असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्याला अमिताभ कारणीभूत ठरले होते.
अमिताभ आणि कादर खान यांची मैत्री इतकी चांगली होती की ते दोघे एकमेकांसाठी वाट्टेल ते करायला तयार होते. अमिताभ यांच्या शब्दाखातर कादर यांनी ‘खुद्दार’ हा चित्रपट कोणतीही सायनिंग अमाऊंट न घेता लिहिला होता. हा चित्रपट हिट ठरलेला. मात्र पुढे अमिताभ चित्रपटसृष्टीतून निवृत्त होणार असं म्हटलं गेलं. ते नवीन चित्रपट साइन करत नव्हते. त्यानंतर ते राजकारणात गेले. लोकसभेत गेल्यानंतर त्यांची राजीव गांधींशी जवळीक वाढली.
यादरम्यान जेव्हा कादर खान यांना अमिताभ इंडस्ट्री सोडणार असल्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, 'अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टी सोडत नाहीयेत, ते फक्त थोडी विश्रांती घेत आहेत. आणि जर अमिताभ बच्चन यांनी खरोखरच अभिनय सोडला, तर मी सुद्धा इंडस्ट्री सोडून देईन.' त्यांचं नातं इतकं घट्ट होतं. मात्र नंतर अमिताभ यांना गर्व झाला. ते अहंकारी झाले असं सांगण्यात येतं.
लेखक आणि पत्रकार हनीफ झवेरी यांनी ‘मेरी सहेली’शी बोलताना सांगितलं की अमिताभ बच्चन किंवा कादर खान या दोघांपैकी कोणीही मला हे थेट सांगितलं नाही, परंतु कादर खान यांची एक मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “अमिताभ बच्चन यांची अशी इच्छा होती की मी त्यांना ‘सर’ म्हणून हाक मारावी. मी तसं करू शकलो नाही. ज्याच्याबरोबर माझी इतकी जुनी मैत्री होती, ज्यावेळी मी चित्रपटात आलो तेव्हापासून ज्याला ओळखतो, त्याला मी अचानक ‘सर’ कसं म्हणू शकेन? तिथूनच आमच्यात मतभेद सुरू झाले आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो,” असं कादर खान म्हणाले होते.
अशोक सराफ यांनाही झाली 'ग'ची बाधा? लक्ष्मीकांत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले- त्याने नेहमी माझ्या ड्रायव्हर, भावाची भूमिका ...