ठाणे : वाढती महागाई, इंधनदरातील चढ-उतार आणि वाढता आस्थापना खर्च यामुळे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या तुटीतून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाने तब्बल ११ वर्षांनंतर बस भाडेवाढीचा गांभीर्याने विचार सुरू केला असून, तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ठाणेपरिवहन सेवेचे वार्षिक उत्पन्न साधारण ९० ते ९५ कोटी रुपये आहे. या उलट, बस चालवण्याचा एकूण वार्षिक खर्च ३५० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये आस्थापना खर्च १५० कोटी रुपये, बस परिचालन १०० कोटी रुपये, ई-बस प्रकल्प ५० कोटी रुपये, तसेच इंधन, वीज आणि देखभाल-दुरुस्ती या खर्चांचा समावेश आहे. महागाईआणि मनुष्यबळावरील वाढता खर्च लक्षात घेता सध्याच्या जुन्या दररचनेत दर्जेदार सेवा देणे कठीण होत आहे. त्यामुळे सेवा टिकवण्यासाठी भाडेवाढ हाच अंतिम पर्याय असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Navi Mumbai: तुटलेली उपकरणे अन् गंजलेली संरचना, डॉग पार्कची दुरवस्था; पाळीव प्राण्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सवलतींमुळे उत्पन्नावर पाणीसध्या टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बस असून, ३८० बस रोज रस्त्यावर धावतात. दिवसाला सुमारे २.४५ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. दररोज ३० लाखांचे उत्पन्न मिळत असले, तरी विविध घटकांना दिलेल्या सवलतींमुळे दिवसाला पाच ते सहा लाख रुपयांच्या संभाव्य उत्पन्नावर प्रशासनाला पाणी सोडावे लागत आहे.
‘बेस्ट’च्या धर्तीवर दररचनेचा विचार२०१५ मध्ये शेवटची किरकोळ भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये एसी बसचे दर उलट ४० ते ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. मात्र, आता वाढता तोटा सहन करणे कठीण झाल्याने प्रशासनाने भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या धर्तीवर नवीन तिकीटदर निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
MSRTC: वाढीव वेतनाची फाइल अर्थ खात्यात रखडली; एसटीचा १६ वेळा पत्रव्यवहार तरीही निधी नाही; तिढा सुटणार कधी?