Donald Trump न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हलं. या निर्णयातील माहितीनुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादले.
अमेरिकेच्या संविधानानुसार कर आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून काँग्रेस म्हणजेच संसदेला मिळालेला आहे. मात्र, ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरलं. ट्रम्प यांनी हे निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं. टॅरिफ शिवाय अमेरिका उद्धवस्त होईल, असं ट्रम्प म्हणाले होते.