आसू - योगशिक्षक डॉ. सुनील शिंदे यांना वेब्बिक युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट
esakal February 23, 2026 01:45 AM

डॉ. सुनील शिंदे
यांना मानद डॉक्टरेट

आसू : घाना- यूएसए येथील वेब्बिक युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे आयोजित तमिळनाडू (भारत) येथील पदवी वितरण कार्यक्रमात योगशिक्षक डॉ. सुनील शिंदे यांना कुलगुरू प्रा. फेलिक्स ओफोसू जॅन यांच्या हस्ते कायरोप्रॅक्टिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तमिळनाडूतील कोइमतूर येथे पदवी वितरण कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी संस्थापक व मुख्य तांत्रिक संचालक कुलगुरू प्रा. फेलिक्स ओफोसू जॅन, अध्यक्ष व मुख्य परीक्षक डॉ. ए. के. वैकोम कन्नडन, वेब्बिक युनिव्हर्सिटी प्रशिक्षक मानद डी. पी. टी. डॉ. संनोज, आयुर्वेद वैद्य
(अस्थि व सांधेरोग तज्ज्ञ) डॉ. जया यांची उपस्थिती होती. वेब्बिक युनिव्हर्सिटी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी शिक्षण संस्था आहे. तिचे प्रशासकीय मुख्य कार्यालय घाना (पश्चिम आफ्रिका) येथे असून, शैक्षणिक सहकार्य व मान्यता प्रक्रियेत अमेरिका (यूएसए) येथील संस्थांशी संलग्नता आहे.
---------------------------
02535
कोइमतूर (तमिळनाडू) : येथे प्रा. फेलिक्स ओफोसू जॅन यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारताना डॉ. सुनील शिंदे.
----------------------------

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.