26408
समई नृत्यातून महिलांचा कलाविष्कार
कणकवलीतील श्रीमहापुरूष मंदिराचा रौप्य महोत्सव
कणकवली, ता.२२ : शहर बाजारपेठेतील श्रीमहापुरूष मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात किंजवडे (ता.देवगड) येथील पावणादेवी मंडळाच्या महिलांनी बहारदार समईनृत्य सादर केले. त्याला उपस्थितांकडून जाेरदार दाद मिळाली.
श्रीकलेश्वर दशावतार मंडळाने ‘एकपदा अर्थात पृथ्वीकंकण’ हा नाट्यप्रयोग सादर केला. त्यालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
महापुरूष मंदिराच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. यावेळी नगरसेविका सुप्रिय नलावडे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, सुमेधा अंधारी, आर्या राणे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्नील राणे, मनस्वी ठाणेकर, संजय कामतेकर यांच्यासह महापुरुष मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, माजी अध्यक्ष राजू सापळे, राजन पारकर, सचिव महेंद्र सांब्रेकर, खजिनदार मंदार सापळे, राजू मानकर, चैताली मुंज, वैशाली काणेकर, अमित सापळे, साकेडीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम, प्रद्युम मुंज, चेतन अंधारी, निखिल घेवारी, सोहम वाळके, उदय मुंज, विशाल उर्फ दादा मुंज, अक्षय डिचोलकर, संदीप अंधारी, वृषभ मेनकुदळे, महेश अंधारी, प्रसन्ना देसाई, हरीष उचले, रोशन मांगले आदी उपस्थित होते.