किवळे, ता. २२ : आदर्शनगर येथील जय श्रीराम चौकातील शिवशंभो कॉलनीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवचरित्रकार प्रा. विक्रम कदम यांचे व्याख्यान झाले.
शिवचरित्रकार प्रा. कदम यांनी शिवाजी महाराज यांचा जीवन-संघर्ष समजावून सांगितला. नगरसेवक नीलेश तरस, ऐश्वर्या तरस, धर्मपाल तंतरपाळे, रेश्मा कातळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, लखन तरस आदी उपस्थित होते.
शिवजयंती महोत्सव समितीचे मुख्य आयोजक संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रवीण कदम, आदर्शनगर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तायप्पा धनगर यांनी संयोजन केले. सचिन पाटील, चेतन शितोळे, बसप्पा खेत्री, अमोल विटकर, रामदास घोटकुले, मधुकर माने यांचे सहकार्य लाभले. महेश शिंदे पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका पोळ यांनी सूत्रसंचालन केले.