Elvish Yadav Faces Trolls: बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तो प्रसिद्ध यूट्यूबर देखील आहे. काही दिवसांपासून तो डेटिंग शोमुळे चर्चेत आहे. एल्विश यादव जिया शर्मासोबत एंगेज्ड 2 हा शो होस्ट करत आहे. या शोमधील अनेक क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दरम्यान, हा शो सध्या बोल्ड कंटेटमुळे चर्चेत आला आहे. या शोमधील स्पर्धक अतिशय धाडसी टास्क पूर्ण करताना दिसत आहे. काही स्पर्धक एकमेकांशी जवळीक साधत आहेत. तर, काही स्पर्धक टास्क पूर्ण करण्यासाठी महिला जोडीदाराला आंघोळ घालताना दिसत आहे. प्रोढ स्वरुपाचे टास्क आणि सीन्स पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
एंगेज्ड 2 मध्ये स्पर्धकांना अतिशय धाडसी आणि बोल्ड टास्क दिल्यामुळे चर्चेत आहे. या शो मधील बोल्ड कंटेटमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 14 फेब्रुवारीपासून हा शो स्ट्रीम होत आहे. या शोमधील टास्कचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही स्पर्धक एकमेकांशी जवळीक साधताना दिसत आहे. तर, काही पुरुष स्पर्धक महिला जोडीदाराला आंघोळ घालताना दिसत आहे. तर, एका टास्कमध्ये पुरुष स्पर्धक महिला जोडीदाराचे टी शर्ट हात न लावता तोंडाने काढण्याचा प्रयत्न करत आहे.
View this post on Instagram
या शोमधील टास्क पाहून प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या शोमधील टास्क पाहून नेटकऱ्यांनी कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. एल्विश यादवलाही ट्रोल केलं जात आहे. तो या शोचा होस्ट असल्यामुळे त्याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, वादग्रस्त टास्क दाखवल्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टास्कमुळे प्रेक्षकांनी या शोचा विरोध केला आहे. हा विरोध पाहता निर्माते यावर काय पाऊल उचलणार? काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, हा शो बंद होणार की टास्कमध्ये बदल होणार? हे लवकर समोर येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या: