Holi Festival 2026: होळीत देशभर ८० हजार कोटींची उधळण; बाजारपेठांमध्ये तेजीचे रंग
esakal February 23, 2026 06:45 PM

नागपूर : होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये आर्थिक तेजीचे रंग उधळले जाणार आहेत. देशभरात ८० हजार कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ६० हजार कोटींच्या उलाढालीच्या तुलनेत यंदा सुमारे २५ टक्क्यांची मोठी वाढ दिसून येत आहे.

‘वोकल फॉर लोकल’ आवाहनाचा व्यापक परिणाम बाजारपेठांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. २०२१ पूर्वी बाजारपेठांवर चिनी वस्तूंचे मोठे वर्चस्व असायचे, मात्र आता भारतीय बनावटीचे हर्बल गुलाल, नैसर्गिक रंग, आकर्षक पिचकाऱ्या, चंदन आणि पूजेच्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.

ग्राहकांनी विदेशी वस्तूंऐवजी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना पसंती दिल्याने भारतीय उद्योगांना मोठी उभारी मिळाली आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रात सुमारे १० हजार कोटींचा व्यापार होण्याचा अंदाज कॅटचे राष्ट्रीय मंत्री शंकर ठक्कर यांनी व्यक्त केला आहे.

Sangli News: देशभरात हळदीचे क्षेत्र वाढले; आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात पावसामुळे उत्पादनात चढ-उतार.

मुंबईतील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा सध्या रंगीबेरंगी गुलाल आणि सुका मेव्याच्या पाकिटांनी सजल्या आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये पारंपरिक ‘गुजिया’ खरेदीसाठी मोठी गर्दी होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.