Alleged incident at Milan Banquet Hall in Sikri sparks outrage online; users demand action after images of historical figures seen inside washroom : एका बँकेट हॉलमध्ये स्वच्छतागृहात भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मावती यांचं छायाचित्र लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. हॉलच्या मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ राजस्थानातील सीकरी येथे असल्याचा दावा करण्यात येतो आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘मिलन बेंकट हॉल’च्या बाथरूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच राणी पद्मावती यांचे छायाचित्र लावलेले दिसत आहे. या प्रकाराचा आता विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जातो आहे.
Viral Video : माणुसकीला लाज आणली ! दारात भीक मागायला आलेल्या महिलेसोबत धक्कादायक कृत्य, व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संतापव्हिडीओमध्ये दिसतंय त्या प्रमाणे, संबंधित हॉलच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे लावलेली आहेत. या कृतीमुळे मेवाड आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. “श्री श्रीछत्रपती शिवाजी महाराज व राणी पद्मावती यांच्या चित्राचा अपमानकारक वापर करण्यात आला असून, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. यात सहभागी असलेल्या व्यक्तींना योग्य ती शिक्षा मिळावी,” अशी मागणी एका नेटकऱ्याने केली आहे.
Viral Video : 'माझ्या घरात तिला ठेवायला जागा नाही'..आईला वृद्धाश्रमात सोडणारी निर्दयी मुलगी; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरलहा व्हिडीओ ‘Prashant Raj Man’ नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि शेअर्स होत असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित फोटो बदलण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळ माध्यम समूह या व्हिडीओची पुष्टी करत नाही.