मुलांच्या अपहरणाचा संशय! जमावाकडून बेदम मारहाण, उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू, जळगावमध्ये खळबळ 
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा February 25, 2026 02:43 AM

जळगाव : जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्रतिक अंदाज आहे, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास करताना, मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हान ही पोलिसांच्या समोर आहे

तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण केली होती

जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात , एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा ३ वर्षांचा मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बघता बघता मोठा जमाव गोळा झाला. जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी सदर तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या.

या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा 'मॉब लिंचिंग'चा प्रश्न ऐरणीवर 

गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मनोहर सोनवणे, अजय कोळी, प्रशांत सोनवणे, अजय ऊर्फ बादल सोनवणे आणि अफताब आरिफ खाटीक अशा पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या  या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा 'मॉब लिंचिंग'चा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सख्या भावानेच बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली

चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सख्या भावानेच बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली आहे. भद्रवती शहरातील झाडे प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. सुरज शंकर भोंडे वय 28 वर्षे असं आरोपीचे नाव असून संजीवनी शंकर भोंडे वय 32 वर्षे असे मृतक बहिनीचे नाव आहे तर सौ पुष्पा शंकर भोंडे वय 58 वर्षे असे गंभीररित्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.