Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! 'ऑपरेटिंग सिस्टीम' बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार
esakal February 26, 2026 01:45 AM

डोंबिवली : मलंगगड येथील फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका बेजबाबदार व्यक्तीने रोपवेची ऑपरेटिंग सिस्टीम हाताळली आहे. त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित देखील केल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर रोपवेच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तसेच ठाणेजिल्हाधिकारी व ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, विनोद पाटील हा रोपवे प्रकल्पाशी अधिकृतरीत्या संबंधित नसतानाही त्याने बेकायदेशीररित्या फ्युनिक्युलर रोपवेच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा ताबा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

दरम्यान, श्री मलंगगड यात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवेचे लोकार्पण करण्यात आले होते. भाजप आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले होते. भाविकांच्या सोयीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक येथे दाखल होत असताना सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप तक्रारीतून पुढे आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mr_Vinod Patil 8888 (@mr_vinod_patil_8888)