कुठे बाहेर फिरायला किंवा बिझनेस ट्रिपला गेल्यावर अनेकदा हॉटेलमध्ये राहण्याचा योग येतो. हॉटेलमध्ये सर्व सुखसोई असतात त्यामुळे अनेक लोक हॉटेलमध्येच राहणे पसंद करतात. पण काही वेळा तुम्हाला हॉटेलमध्ये रुम नाकारली जाते.
परंतु तुमच्यासोबत एखादी महिला असेल तर अनेकदा हॉटेलमधील कर्मचारी तुम्हाला राहण्यासाठी मनाई करतात. परंतु तुमच्याकडे एक कागदपत्र असेल तर हॉटेलचा मालकदेखील तुम्हाला रुम देण्यासाठी मनाई करू शकत नाही.
तुम्ही अल्पवयीन नसाल तर तुम्हाला हॉटेलमध्ये रुम देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही सज्ञान असल्याचे, वयाचा पुरावा असल्याचे कादपत्र तुमच्याकडे असेल तर कायद्यानुसार तुम्हाला कोणासोबतही राहता येते. तुम्हाला कायद्यानुसार कोणीही अडवू शकत नाही.
परंतु अनेकदा सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन हॉटेलचे मालक तुम्हाला रुम नाकारतात. किंवा काही संशयास्पद बाब आढळून आल्यासही काही हॉटेलचे मालक रुम देण्यास नकार देतात. अनेकदा काही कपल्सही रुमची मागणी करतात.
परंतु कोणतीही कायदेशीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनही हॉटेलचा मालक रुम देण्यास नकार देऊ शकतो. परंतु योग्य ओळखपत्र, तुम्ही सज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर अनेकदा तुम्हाला राहण्यासाठी रुम दिली जाते.