Zero Dep Car Insurance Benefits: कार खरेदी करणे हे प्रत्येकाच स्वप्न असतं. मात्र केवळ कार घेणे पुरेसे नसून तिचे योग्य संरक्षण करणेही तितकेच आवश्यक असते. म्हणूनच अनेक जण कारसाठी Zero Depreciation Insurance (झिरो डेप्रिसिएशन इन्शुरेंस) निवडतात. हा विमा नेमका काय असतो, त्याचे फायदे-तोटे कोणते आणि तो कोणासाठी योग्य आहे, हे समजून घेऊयात.
सामान्य कार विमा पॉलिसीमध्ये अपघातानंतर दुरुस्तीचा खर्च भरताना वाहनाच्या भागांची घसरण लक्षात घेतली जाते. म्हणजेच धातू, प्लास्टिक किंवा रबरचे भाग कालांतराने झिजतात, असे गृहीत धरून विमा कंपनी दावा रक्कम कमी करते. त्यामुळे प्रत्यक्षात वाहनधारकाला काही खर्च स्वतः करावा लागतो.
Gold Rate Today: सलग 7 व्या दिवशी सोनं महागलं! सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा ताजा भाव झिरो डेप्रिसिएश विमामात्र झिरो डेप्रिसिएशन कव्हरमध्ये ही घसरण वजा केली जात नाही. त्यामुळे बदललेल्या भागांची जवळपास पूर्ण किंमत मिळू शकते. उदाहरणार्थ, कारचा बंपर बदलण्यासाठी ₹10,000 खर्च आला, तर सामान्य विम्यात त्यापेक्षा कमी रक्कम मिळू शकते. पण झिरो डेप्रिसिएशन पॉलिसीमध्ये जवळपास संपूर्ण खर्चाची भरपाई मिळण्याची शक्यता असते.
झिरो डेप्रिसिएशन विम्याचे फायदेदावा करताना डेप्रिसिएशन वजा होत नाही
दुरुस्तीचा खर्च कमी पडतो
स्वतःच्या खिशातून कमी पैसे द्यावे लागतात
नवीन गाड्यांना अधिक संरक्षण मिळते
महागड्या कारच्या सुट्या भागांसाठी उपयुक्त
बंपर, काच आणि प्लास्टिक भागांवर चांगले कव्हर मिळते
विमा प्रीमियम साधारण 15 ते 20 टक्क्यांनी जास्त असतो
जुन्या गाड्यांसाठी सहसा उपलब्ध नसतो
वर्षभरात मर्यादित दावे करता येतात
इंजिन बिघाड किंवा सामान्य झीज यांचा समावेश नसतो
गाडी जुनी असल्यास अतिरिक्त खर्च फायदेशीर ठरत नाही
नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी
लक्झरी किंवा महागड्या कार मालकांसाठी
रोज जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी
पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी
ज्या वाहनांचा वापर कमी होतो किंवा गाडी जुनी आहे, त्यांच्यासाठी साधा विमादेखील पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे कारचे वय, वापर आणि बजेट लक्षात घेऊनच झिरो डेप्रिसिएशन विमा घ्यायचा की नाही हे ठरवणे योग्य ठरेल.