टी-20 विश्वचषकाच्या रंगमंचावर आता क्षणाक्षणाला नाडीचा ठोका वाढवणारी वेळ आली आहे. श्रीलंकेला आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुरफटवणाऱया न्यूझीलंडला सेमीफायनलसाठी केवळ एका विजयाची गरज आहे. पण समोर आहे फॉर्मात परतलेले इंग्लंड. आधीच उपांत्य फेरीचे तिकीट खिशात टाकलेल्या इंग्लिश सैन्याला गमावण्यासारखे काही नाही, तर किवींसाठी ही लढत ‘करो या मरो’ची आहे. पण या सामन्याकडे सर्वाधिक लक्ष असेल पाकिस्तानी संघाचे. कारण न्यूझीलंडच्या पराभवावर त्यांचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असेल.
संभाव्य संघ ः इंग्लंड ः हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), टॉम बॅण्टन, जेकब बेथेल, फिल सॉल्ट, बेन डकेट, सॅम करण, विल जॅक्स, जेमी ओव्हर्टन, रेहान अहमद, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, जोश टंग, ल्यूक वुड.
न्यूझीलंड ः मिचेल सॅण्टनर (कर्णधार), फिन अॅलन, टीम सीफर्ट, डेव्हन कॉन्वे, मार्क चॅपमन, कोल मॅकॉन्ची, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काइल जेमिसन, इश सोढी.